शिवाजी महाराज ..!!
माझ्या फोटों पैकी सगळ्यात बेस्ट फोटो असा मी याचा वर्णन करीन.अर्थात तुमचाकडचा बेस्ट फोटो अजुन यायचाय असा जर तुम्ही सतत म्हणत राहिलात तरच तुम्ही बेस्ट फोटो करता फोटोग्राफी सुरु ठेऊ शकता. अणि तो तुम्हाला कधी अणि कुठे कधी मिळेल माहिती नाही.just searching for new . परत तेच कि या फोटो करता नशीब लागते.या फोटो मधली मजा म्हणजे हा sunset नाही तर हा sunrise आहे.रायगड वर जिथे हा पुतळा आहे त्याच्या समोर एक बाजूला छोटी टेकडी आहे.त्यामुळे sunset च्या वेळेला सूर्य दिसतच नाही.पण sunrise च्या वेळेला जर समोर उभा राहिला तर असा फोटो घेता येऊ शकतो.सकाळी ५.३० वाजल्यापासून मी हा फोटो घेण्याकरता धडपड करत होतो. थोडा edit केल्यावर हा sunset सारखा effect मिळाला. पूर्वी ग्राहकपेठेच्या वह्यान्वर असा फोटो असायचा.पण आज मी अभिमानाने सांगू शकतो की या "श्रीमंत योगी " माणसाचा हा original फोटो माझ्या कड़े आहे.मला खरया अर्थाने रायगड अणि महाराजांनी दिलेला आशीर्वाद आहे.