Friday, April 23, 2010

कसबा पेठ

फोटो काढण्याकरता सगळ्यात आकर्षक पण तितकाच अवघड विषय म्हणजे म्हातारी माणसे आणि लहान मुले.मला यांचे फोटो काढायला खुप आवडत.त्यांची expressions आणि त्यांच्या लकबी,त्यांचा एका जागी बसून चाललेले उद्योग कैमेरा मध्ये टिपून घेणे हे खुप आव्हानात्मक असते.हे आजोबा मला कसबा पेठेत,ताम्बट आळी मधे सापडले.मी एका प्रोजेक्ट साठी फोटो शूट करयाला गेलो होतो.ते त्यांचे  काम संपवून नुकतेच बसले होते.या वयात देखील हा त्यांचा काम करण्याचा उत्साह बघून मी थक्क झालो.ते माझ्या कडे बघत बोलत होते मला त्यांचा चेहर्यावरचे हावभाव खुप आवडले.अणि मी पण बोलता बोलता त्यांचा एक फोटो काढून घेतला.अणि मजा अशी की हा फोटो मी B & W काढला आहे.अणि त्यातच त्याची सगळी मजा आहे असा मला वाटते.

No comments:

Post a Comment