Monday, September 20, 2010

Padma...

पद्मा...म्हणजे  या फोटोत जो मुलगा आहे ना  त्याचे  नाव पद्मा.हा आणखी एक नशिबाचा फोटो.तो रस्त्याचा  सुंदर curve .. लाल object अजुन काय पाहिजे,?? हा फोटो मला लामायारूला मिळाला.पहिल्यांदा २००७ मधे लेह ला गेलो होतो.दुपारी भरपेट जेऊन सगळे आडवे.(नेहमी प्रमाणे).आणि  मी आपला frame च्या शोधात.मग जेंव्हा परत २०१० मधे मी लामायारूला गेलो तेंव्हा मला परत हा(पद्मा) भेटला.आता तो खुप उंच झालाय,मोठा झालाय.तो तिकडच्या शाळेत मंत्र शिकतो. monk  होण्यासाठी.त्याचे आता ३ पैकी २ वर्ष पूर्ण झाली आहेत.त्याचा नंतर तो तिकडे असेल  नसेल..काय माहिती.??? पण या फोटो मुळे या मित्राला मी कधीच विसरणार नाही. काही फोटो खरच मनात घर करून जातात.कायमच...



पुरंधर.महाराजांच्या इतिहासातील एक महत्वाचा किल्ला.गो.नी.दा नी लिहून ठेवलय " पुरंदर चे दिसणे उग्र आहे.पुरंधर चे लढणे उग्र आहे,त्या साठी मुरारबाजीने दिली लढाई उग्र आहे."हा पुतळा मुरारबाजीचाच. आपल्याला झटकन इतिहासात घेउन जातो.आता पुरंदर वर बघण्यासारखे काहीही नाही.या अद्वितीय योध्याला मानाचा मुजरा.......

Saturday, July 24, 2010

Paalkhi

पालखी.फोटो काढण्याकरता याच्यासारखा आकर्षक विषय दुसरा नाही.दर वेळेला तोच रस्ता,तेच वारकरी,तीच पांडुरंगा भेटीची ओढ़,तोच पाउस पण दरवर्षी फोटो मात्र निराळे.प्रत्येक फोटो ची फ्रेम वेगळी विषय वेगळा.या फोटोत सगळी फ्रेम घेण्यापेक्षा ती ढोलकी, त्याने पकडलेली ग्रिप, reflection आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्याची या फोटोत दिसत असणारी लगबग.पंढरपुर भेटीची लागलेली ओढ़ ही अशी फोटोतुन मिळाली की खरच आनंद होतो.या पेक्षा आणखी अधिक काय बोलणार?

Friday, July 23, 2010

कारगिल

अजुनही आपल्या देशात लहान मुलांची स्थिति काय आहे पहा.कारगिलला काढलेला हा फोटो.आम्ही hotel सियाचिन मधून बाहेर पडत असताना मला समोरच्या खिडकीत ही दोन छोटी मुले दिसली.फोटोवरून ती भावंडा असतील हे सहज लक्षात येत.एकंदर त्यांच्या हावभावावरून ती फार श्रीमंत घरातील असतील असे  मला वाटत नाही.त्या मुलाच्या हातात असलेल्या रोटी वरून यांचा भविष्य काय  असेल? ही मुले काय खेळत असतील? असे प्रश्न मनाला दुखवून गेले.....

Saat Rangancha Khel..!!!!

इंद्रधनुष्य.प्रत्येक फोटोग्राफरचा आवडता subject . नीट पहिला तर लक्षात येईल की हे एक नसून २ इंद्रधनुष्य आहेत.याला इंद्रवज्रा म्हणतात.हे फारच दुर्मिळ असत.मी लेह ला फारच नशीबवान ठरलो.की आज हे माझ्या संग्रहात आहे.एकटाच बाइक वरून फिरत होतो फोटो काढत...तेवढ्यात पाउस आणि उन यांचा खेळ सुरु झाला.तेवढ्यात माझ्या लक्षात आला की हे तर परफेक्ट climate  आहे.पण मला समोर काहीच दिसत नव्हता.मी सहज गाडीच्या आरशात पहिला तर मला आरशात इंद्रधनुष्य दिसले .मी तशीच  गाड़ी पटकन बाजूला घेतली.त्या गडबडीत माझी  लेन्स आणि पिशवी कुठे तरी वाळूत सांडली.पण तिअकड़े लक्ष ना देता मी पटापट फोटो काढायला  सुरुवात केली.कारण हा अविष्कार २-३ min टिकतो हे मला माहिती होते.ही संधि पुन्हा पुन्हा येणार नव्हती.पण नंतर जेंव्हा मी हा फोटो नीट पहिला तेंव्हा माझ्या लक्षात आले की या फोटोत मी काय मिळावलय  ते ..!! निसर्गाचा पुन्हा एकदा आशीर्वाद.

मनाली.

मनाली.निसर्गाचा वरदहस्त असलेला हिमालायातला एक सुंदर गाव.माझा मनाली मधला आता पर्यंतचा सगळ्यात बेस्ट फोटो.मंदिरात अतिशय भक्तिभावाने पूजा,स्तोत्र म्हणत असलेल्या माणसांचा मला नेहमीच हेवा वाटतो.कारण मला हे जमत नाही.उलट असे  जर कोण  करत असेल तर देवापेक्षा माझा लक्ष पटकन त्या माणसा कडे जाते.कारण तिकडे  एक चांगला फोटो असतो.नेहमीच.सकाळी मनु temple मधे काढलेला हा फोटो आहे. त्या माणसापेक्षा त्याचा हात त्यावर पडलेला सकाळचा light त्याने पकडलेली अगरबत्ती हे खुप intresting  वाटले.


काही काही वेळेला अनपेक्षितपणे काही photos मिळतात.गोव्यातल्या एका जुन्या घरात हा फोटो मिळाला.दरवेळेला कुठल्याही object चा समोरुनच फोटो काढयाची गरज नसते.या मांजरीचा जो मागुन फोटो काढलाय त्या composition मधे  सगळी मजा आहे.हा फोटो समोरून एवढा चांगला आला नसता.ती ज्या  pose मधे बसलेय ती मागुन खुप सुंदर आहे.नीट  पहिला तर मागे एका आजींचे पाय पण दिसतील.म्हातारी माणसे ,जुनी घर,अणि मांजरी हे कोकण अणि गोव्याचे वैशिष्ट आहे.अणि फोटो करता तर म्हणजे सोन्याहून  पिवळे.